Wednesday, June 11, 2014

अच्छे दिन आनेवाले है .....???????

अच्छे दिन आनेवाले है .....???????

भारतीय संघराज्याचे पंधरावे पंतप्रधान म्हणून मा. नरेंद्र मोदीजी यांनी सुत्रे हातात घेतली आहे.त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन !

आज आपल्या खंडप्राय देशाला अनेक समस्यांनी घेरले आहे. वाढलेले महागाई, बेरोजगारी, घटलेले दरडोई उत्पन्न, महिलावरील वाढते अत्याचार याचबरोबर ऩक्षलींची अंर्तगत समस्या आज देशासमोर आ वासून उभी आहे.

याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर डागाळलेली भारताची प्रतिमा मोदींजींना सावरायची आहे. आज भुतान सोडले तर आपल्या सभोवतालचे सर्वच देश चीनच्या लाल झेंड्याखाली आलेले आहेत. भारतासाठी ही मोठी धोक्याची सुचना आहे. या सर्व समस्यांना हे सरकार कसे सामोरे जाते, यावरच खरेच जनतेला चांगले दिवस पाहता येतील का हे सांगता येईल  ?        

No comments:

Post a Comment