Tuesday, September 9, 2014

भारताचे नंदनवन संकटात

भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या साठ वर्षातील भीषण पूर आला आहे. गेली काही दशके अतिरेकी कारवाईपासून त्रस्त असलेल्या जम्मू-काश्मीरवर मोठी नैसर्गिक आपत्ती कोसळली आहे.

आज भारतीय सेना अतिरेक्याबरोबरच निर्सगाशीही लढा देत आहे. या नैसर्गिक आपत्तीने जम्मू-काश्मीरमधील लोक भारताच्या आणखी जवळ आले आहेत. भारतातील विविध राज्यांनी संकटाच्या या प्रसंगी जम्मू-काश्मीरला अधिकाधिक मदत करुन तेथील जनतेस  भारताच्या आणखी जवळ येण्यास साहाय्य केले तर काश्मीरच्या जनतेस भारतापासून कोणीही दूर करु शकणार नाही .